Purushottam English School Nashik Road

शाळेचा इतिहास

कै. रावबहादुर मानाजी राजुजी कालेवार यांनी पुरुषोत्तम नावाच्या आपल्या नातवाच्या स्मरणार्थ मे १९३० रोजी शाळा सुरु केली. ही शाळा पाचबंगला या परिसरात भरत असे. कामगार वर्ग, गरीब मुले यांच्या आत्मविकासाच्या व्यापक उद्दिष्टाने ही शाळा सुरु झाली. नाशिक परिसरात राष्ट्रीय शिक्षणाच्या उदात्त हेतुने काम करणाऱ्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक या संस्थेकडे इ स १९३७ ला शाळा सुपूर्द करण्यात आली . शाळेचे पहिले मुख्याध्यापक आदरणीय ल. पां. सोमण सर होते. इसवी सन १९४० साली सुनंदा लेले या पहिल्या स्त्री शिक्षिका रुजू झाल्या. १९४० परीक्षेला बसले आणि निकाल ६४ % इतका लागला. ला प्रथमच अकरा विद्यार्थी मॅट्रिक शाळेच्या इमारतीची चार एकर जागा श्रीमंत सरदार बुटी (नागपूर) यांचेकडून नाममात्र 1000 रुपये फक्त देऊन संस्थेला मिळाली.

 

2 महत्वाचे सोहळे.
शाळा स्थापना वर्ष :- १ मे १९३७
रौप्यमहोत्सवी वर्ष :- १९६२-६३
सुवर्णमहोत्सवी वर्ष :- १९८९-९०
हिरकमहोत्सवी वर्ष :- ११९७-९८
अमृतमहोत्सवी वर्ष :- २०११-१२
3 वास्तूतील महत्वाच्या बाबी :-
१) २३ एप्रिल १९६० नगराध्यक्ष मा. श्री. मा. गं. आहेर व नाशिक रोड देवळाली नगरपालिकेकडून रु. १५०००/- देणगी प्राप्त झाली. पुरुषोत्तम चे भव्य खुले नाट्यमंदिराचे उद्घाटन पृथ्वी थिएटर्स निर्माते पृथ्वीराज कपूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
२) १९६० साली शाळेची दुमजली इमारत पुर्णत्वास आली .
३) शाळा मान्यता :- २४ डिसेंबर १९६०
४)१९६० साली क्रीडा क्षेत्राचाही विकास झाला. तत्कालीन श्रीमंत व्यापारी श्री. रामभाऊ माळी यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ रुपये १५००/- फक्त देणगी दिली. त्यातून कुस्तीसाठी हौद बांधला गेला. ५) बिटको कंपनीचे श्री जयराम भाई बिटको यांच्याकडून रुपये १५०००/- फक्त देणगी मिळाली. यानंतर शाळेच्या ग्रंथालयाचे श्री. जयराम भाई बिटको असे नामकरण करण्यात आले.
६) ३ मे १९७९ रोजी माननीय नामदार प्रा. सदानंद वर्दे, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते कै. टी. एस. लेले प्रयोगशाळेच्या बांधकामाचा शुभारंभ झाला.
७) सन २००७ रोजी चैत्र शु. प्रतिपदा गुढीपाडवा यादिवशी माजी विद्यार्थिनी उषा ताई परांजपे यांनी ५,०५,०००/- रुपये देणगी दिली. यातून संगणक कक्ष अद्ययावत करण्यात आला व संगणक कक्षाला 'उन्मेषा' नाव देण्यात आले.
८) २३ मार्च २०१२ रोजी अमृतमहोत्सवानिमित्त शाळेच्या मैदानाच्या ईशान्य दिशेला संकल्पित नूतन वास्तूचे भूमिपूजन करण्यात आले व येथे भव्य दिव्य सभागृह उभारण्यात आले. २८ मे २०१७ रोजी माजी मुख्यमंत्री नामदार . श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांच्या हस्ते संस्थेचा शतक महोत्सव उद्घाटन सोहळा संपन्न झाला .या प्रसंगी उपस्थित श्रीमती गंगुताई व सिंधूताई धामणकर यांनी दिलेल्या १,००,००,०००/- (एक कोटी) फक्त च्या देणगीतून सभागृहाचे नामकरण ' धामणकर सभागृह ' असे करण्यात आले.
• नामंकित पुरस्कार :-
१) इ सन २००३ - अनाथांचा नाथ ही एकांकिका राज्य स्तरीय बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांका विजयी ठरली. २) इ सन २००७ - १८ ऑक्टोबर २००७ रोजी संगणक क्षेत्रातील भरघोस उपक्रमासाठी पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालयास भारत सरकारच्या संचार व सूचना औद्योगिक मंत्रालयातर्फे ( 4thComputer Literacy Excellence Award 2005 ) पुरस्कार प्राप्त झाला. ट्रॉफी, प्रमाणपत्र व रुपये १,५०,००० /- फक्त पुरस्कारात प्राप्त झाले.
३) इ सन २००७ - स्टार प्रवाह या दूरचित्रवाणी वरील 'कोहिनूर हा खेळ शब्दांचा' या प्रश्नमंजुषा महाअंतिम फेरीत राज्यात मनिष ताथोडे व हितेश पोरजे या विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला . बक्षिस स्वरूपात कोहिनूर चषक, ५ संगणक व रुपये ५०,०००/- फक्त प्राप्त झाले.
४) क्रीडास्पर्धेत देखील प्रतिवर्षी विद्यार्थी जिल्हा, विभाग व राज्यस्तरापर्यंत यश संपादन करत आहेत
• शैक्षणिक सुयश :-
माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षामध्ये विद्यार्थी घवघवित यश प्राप्त करीत आहेत.राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, गणित कौशल्य व प्रश्नमंजुषा, शिष्यवृत्ती परीक्षा, भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा, एन. एम. एम. एस. परीक्षा, गणित कौशल्य, एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा, संस्कृती ज्ञान परीक्षा, शिवचरित्र स्पर्धा यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षामध्ये विद्यार्थी सक्रीय सहभागी होऊन यशस्वी होत आहेत गुणवंत शिक्षक :-
जिल्हा, राज्यस्तरीय, नामांकित संस्थाचे अनेकआदर्श शिक्षक पुरस्कार शाळेतील शिक्षकांना प्राप्त झाले आहे. शिक्षकांनी सुद्धा अनेक शासकीय प्रशिक्षणात सहभागी होऊन स्वतःची गुणवत्ता वाढविली आहे.
● नामांकित माजी विद्यार्थी :-
प्रथितयश उद्योजक,डॉक्टर, वकील, कलाकार, इंजिनियर, संरक्षण क्षेत्र, शिक्षण इत्यादी सर्व क्षेत्रामध्ये पुरुषोत्तम च्या माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे.
पुरुषोत्तमचे काही सर्वश्रेष्ठ माजी विद्यार्थी
१) डॉ. शिरीष देशपांडे, हृदयरोग तज्ज्ञ, राजेबहाद्दर हॉस्पिटल डिरेक्टर
२) श्री. रमेश रासकर, वैज्ञानिक, USA
३) सौ. कल्पना जोशी, वैज्ञानिक
४) मा. रियाज सय्यद, (IAS) SUBDIVISIONALMAGISTRATE, झारखंड ५) श्री . भार्गव सतीश देशपांडे, PILOT INDIAN AIR FORCE, RANK 1ST
६) प्रा. राम कुलकर्णी, प्राचार्य BYK COLLEGE
७) श्री. मयूर कपाटे, व्यावसायिक
८) श्री. दीपक चांदे, व्यावसायिक
९) श्री. संतोष मंडलेचा, व्यावसायिक
१०) डॉ. उपेंद्र भालेराव, हृदयरोग तज्ज्ञ
११) श्री प्रणव जाधव, लेफ्टनंट, इंडियन आर्मी
प्रतिष्ठित मान्यवर भेटी :-
आदर्श विद्यार्थी व गुणवंत शिक्षकांच्या कार्याने शाळेचा नावलौकिक सर्वदूर पसरलेला आहे.C नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक या संस्थेचे सातत्याने होणारे
मार्गदर्शन आणि सर्वांच्या अथक प्रयत्नातून शाळा विकसित होत आहे. अशा शाळेला वारंवार अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी
भेटी देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
१) कै. श्री. वि. वा. शिरवाडकर, संस्थेचे माजी विद्यार्थी, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक
२) मा. श्री. स. का. पाटील, रेल्वे मंत्री, १९६२
३) मा. श्रीमती शांता शेळके, कवयित्री, १९९१
४) मा. श्री. राजीव म्हसकर, उपशिक्षणाधिकारी, १९९८
५) मा. डॉ. सौ. अंजली कीर्तने, लघुपट निर्माते, २००८
६) मा. डॉ. गिरीष ओक, अभिनेता, २०११
७) मा. श्री. प्रकाश पाठक, प्रसिद्ध वक्ते, २०१६
८) मा. श्री. विजय भाटकर, संगणक जनक, २०१२
९) मा. श्री. देवेंद्र फडवणीस, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, २०१७
१०) मा. श्रीमती. पुष्पा पाटील सहाय्यक उपसंचालक नाशिक २०२० ११) मा. श्री . मच्छिद्र कदम माध्यमिक शिक्षण अधिकारी २०२०
१२) मा. कर्नल अलोक सिंग ACC-Co

शाळेच्या उपक्रमांचे फोटो व माहिती

FitIndia मोहिमे अंतर्गत २ किमी धावणे व सायकलिंग स्पर्धा

ऑगस्ट २०२१ ला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त फिट इंडिया उपक्रमांतर्गत NCC चे ५० विद्यार्थी दररोज २ किलोमीटर धावतात आणि ५ किलोमीटर सायकल चालवतात. कमीत कमी १०००० किलोमीटर धावणे हे या विद्यार्थ्याचे ध्येय आहे

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनः

दरवर्षीप्रजासत्ताक दिनानिमित्त NCC च्या माजी विद्यार्थ्याकडून बेस्ट कॅडेट पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम २५००/- रुपये फक्त आणि कै. श्री. पुरोहित सरांच्या स्मरणार्थ बेस्ट कॅडेट ट्रॉफी देण्यात येते

हिरवांकुर स्पर्धा बी संकलन व रोप निर्मिती कार्यशाळा

हिरवांकुर या संस्थे अंतर्गत विद्यार्थ्यामध्ये निसर्ग व पर्यावरणाविषयी अधिक प्रेम वाढवावे यासाठी बी संकलन व रोपनिर्मिती कार्यशाळा घेण्यात आली यासाठी श्री मुकेश ठोंबरे व श्रीमती सुनीता जगताप यांनी परिश्रम घेतले.

शिक्षण आपल्या दारी

COVID-19 च्या कालावधीत शालेय विद्यार्थ्याच्या दारी जाऊन परिसरातील इतर शाळांच्या विद्यार्थ्यांना देखील अध्यापन करण्यात आले COVID-19 च्या काळात शाळा बंद पण शिक्षण सुरु होते. नाशिक रोड परिसरातील विविध मंदिरे,मंगल कार्यालये, समाज मंदिर इत्यादी ठिकाणी परिसरातील पुरुषोत्तम व इतर शाळांचे विद्यार्थी एकत्रित आले .व शाळेतील शिक्षकांनी प्रत्यक्ष भेटीतून विविध विषयांच्या मुलभूत संकल्पना सांगून त्यांना अभ्यासासाठी प्रेरणा दिली . जेलरोड, लोखंडे मळा, नांदूर, मानूर गाव, जयभवानी रोड, दत्त मंदिर रोड , विहितगाव, देवळाली गाव नेहे मळा, सिन्नर फाटा, चेहडी, सामानगाव रोड, कोटमगाव, हिंगणवेढे, शिंदे पळसे इत्यादी ठिकाणी शाळेतील शिक्षक गटाने जाऊन त्यांनी विद्यार्थ्याना अभ्यासाबद्दल मार्गदर्शन केले . कोविड चे नियम पाळून विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले . या उपक्रमाचे प्रमुख सुभाष पवार सर होते .

भारताचे पहिले CDS जनरल बिपीन रावत यांना श्रध्दांजली अर्पण करतांना NCC चे कॅडेट.

) संस्थेचे कार्याध्यक्ष मा.डॉ. राजेंद्र कलाल, सेक्रेटरी मा. श्री अश्विनीकुमार येवला, सहसेक्रेटरी मा.श्री प्रसाद कुलकणी व मा श्री मयर कपाटे सर व शालेय समिती अध्यक्ष मा श्री जयंत मोंढे सर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित 'वंद्य वंदे मातरम्' या सचित्र प्रदर्शनीचे अवलोकन केले

शहीदांना पुष्पचक्र अर्पण करतांना शालेय पदाधिकारी

शहीदांना पुष्पचक्र अर्पण करतांना शालेय पदाधिकारी. शाळेचा एनसीसी चा माजी विद्यार्थी प्रणव जाधव याने एनडीए व आयएमए ट्रेनिंग पूर्ण केले व भारतीय सेनेत लेफ्टनंटपदी नियुक्त झाला, त्या निमित्त शाळेच्या वतीने व NCC पथकाच्या वतीने सन्मानपत्र देवून प्रणवचा सन्मान करण्यात आला

मराठी भाषा गौरव दिन :- मराठी भाषेतील श्रेष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज

वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यांचा सखोल परिचय विद्याथ्र्यांना व्हावा म्हणून मराठी राजभाषा गौरव दिन नाविन्यपूर्ण असा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

२८ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडी, मराठी साहित्यिकांच्या साहित्याच्या माहितीचे प्रदर्शन आणि विद्यार्थ्याचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

मैदान नुतनीकरण उद्घाटन सोहळा

अध्यक्ष माननीय श्री राजेंद्रजी कलाल सर, सचिव माननीय श्री अश्विनीकुमार येवला सर, माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय श्री मच्छिंद्र कदम सर तसेच संस्था व शाळेचे पदाधिकारी क्रीडाशिक्षक यांचे उपस्थित पुरुषोत्तमच्या क्रीडांगणाचे भूमिपूजन करण्यात आले .तयार होणारे नवीन मैदान विद्यार्थ्याच्या विविध क्रीडा कौशल्यासाठी उपयुक्त ठरणार आहे

शाळेचे मुख्याध्यापक व शाळा समिती अध्यक्षांचे फोटो व नाव

श्री . संजय पांडुरंग चव्हाण

मुख्याध्यापक
Email:

मा. सौ. अलका मुकूंद कुलकर्णी

शालेय समिती अध्यक्षा
Email:

शाळा समिती यादी

क्र. समिती सदस्याचे नाव समितीतील पद
1 मा. सौ. अलका मुकूंद कुलकर्णी अध्यक्षा
2 श्री. संजय पांडुरंग चव्हाण सेक्रेटरी
3 श्री. अमित श्रीमाळी सदस्य फेलोज
4 श्री सुरेश गवंडर सदस्य फेलोज
5 सौ . कामिनी पवार सदस्य फेलोज
6 श्री. उमाकांत वाकलकर सदस्य (शिक्षक प्रतिनिधी )
7 श्री. विजय वडुलेकर सदस्य (शिक्षकेतर प्रतिनिधी)

Contact Details

For any kind of query, contact us with the details below.

शाळेचे संपूर्ण नाव व पत्ता पुरषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय, नाशिकरोड पत्ता: सिंधी कॉलनी, जेलरोड, नाशिकरोड, ता. जि. नाशिक
शाळेच्या प्राचार्य/मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक पुर्ण नाव व संपर्क क्रमांक प्राचार्य मा : अहिरे दिलीप उखा ( ९४२३४६३२३४ ) पर्यवेक्षक १) श्री. दीक्षित संजय सुधाकर (९४२३९२६५३०) २)श्री. वाकलकर उमाकांत पुंडलिक. (७५८८८१६८१७. ३) श्री. बडगुजर मनोहर निंबा (७२१६८३२२५०)
शाळेचा दुरध्वनी क्रमांक ०२५३-२४६५८९३
शाळेचा मेल आय. डी. purushottam1937@gmail.com pesoffice@yahoo.com
शाळेची वेबसाईट www.peschool.co.in