शाळेचा इतिहास
सुमारे ९५ वर्षांपूर्वी इगतपुरी येथे 'कॉन्वेंट स्कूल' नावाची शाळा सुरु झाली. हि शाळा सर्व सामान्य माणसांना परवडणारी नसल्याने एका पाद्री गृहस्थाने सन १९१७ - १९१८ च्या सुमारास पाद्री स्कूल सुरु केले तर दुसरे गृहस्थ आर. आर. उम्रीगर यांनी श्री. एल. एन. गोखले (वकील) श्री. नाईक, श्री. जाधव वकील आर्दीनी बरोबर घेऊन नवीन शाळा स्वतंत्रपणे सुरु केली. वरील मान्यवरांनी शाळेत अध्यापनाचे कार्य केले, परतं हि शाळा सुध्दा अल्पयुवी ठरवली.
शाळेची पार्श्वभूमी -
सन १९२८ च्या सुमारास श्री. शृंगारपुरे यांच्या मार्गदशर्नाखाली शहरात 'नॉशनल स्कूल' सुरु झाले. वरील उल्लेखित पाद्री स्कूल व नॉशनल स्कूल या दोन शाळा, इगतपुरी नगर परिषदेने एकत्र करून जानेवारी १९३० च्या सुमारास शहरात म्युन्सिपल स्कूल बनवले. "म्युन्सिपल हायस्कूल" या नावाने सुरु झालेल्या या शाळेत श्री.गोखले वकील, श्री.महादेव जाधव वकील, श्री. गोकुळदास, श्री. शंकरशेठ लोया, श्री. जॉर्ज पिंटो, श्री. दानमलशेठ, श्री.रतनलालजी बूब, श्री.बी.डी. बोथरा, श्री. आर. जी. चांडक, श्री. डी. एम. गायकवाड, श्री. नन्नावरे, श्री. बर्वे, श्री.आर.आर. बेदरकर, श्री. व्ही. बी. देवळे, श्री. साळी, श्री. मोहमद इस्माईल यांनी खूप परिश्रम घेतले.
मुख्याध्यापक म्हणून श्री. नारायण नवलकर, तर शिक्षक म्हणून श्री. तुंगार, श्री. धर्माधिकारी, आदींनी कार्य केले.इयता १० वी पर्यंत वर्ग झाले. इ. ११ वी मॉट्रीक वर्गाच्या मान्यतेसाठी श्री. गोकुळदास शेठ व श्री. जाधव वकील यांनी तत्कालीन शिक्षणाधिकारी श्री. विठ्ठलराव घाटे यांची परवानगी घेऊन सन १९४२ पासून इ. ११ वी (मॉटीक) परीक्षेस शाळेतील विद्यर्थी बसविले.
शाळेची सरकारी व कायदेशीर मान्यता - जून १९२८ मानली जाते.
शाळा विस्तार व हस्तांतर
श्री. एस.पी. लोया व श्री. हिरालालजी टाटीया यांनी भरीव आर्थिक मदत देवून विस्तारास प्रारंभ केला. गावातील लोकांनी आत्मियता दाखविल्याने व अर्थ सहाय्य केल्याने गावात (इंग्रजीसह) मराठी माध्यमांची,सुसंस्कारयुक्त शाळा सुरु झाली.
पुढे दोन तीन वर्षानंतर नगरपरिषद प्रशासनाला ग्रामव्यवस्था व शिक्षण
व्यवस्था पहाणे अवघड झाले म्हणून त्यांनी तत्कालीन नगराध्यक्ष श्रीमान शंकरशेठ लोया यांच्या
अध्यक्षतेखाली सर्वानुमते सदर शाळा (म्युन्सिपल हायस्कूल) "नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ - नाशिक" या आदर्श व नामांकित शिक्षण संस्थेस सन १९४५ मधील जून महिन्यात चालविण्यास दिली.
* शाळा बांधकाम *
विद्यार्थी संख्या वाढल्याने तत्कालीन मुख्याध्यापक श्री. उ. प्र. ताडे यांनी शिक्षणप्रेमी नागरिकांची सभा घेतली या वेळी श्री, लादूराम बोथरा, श्री. दानमल बूब, श्री. राम बक्षीराम राठी, श्री. मसाणी साहेब, आदींनी देणग्या दिल्या व बांधकाम सुरु झाले.
या वेळी श्री.पुनमचंद बूब, श्री. अग्याराम बूब, श्री. किसनलालजी यांनी स्व. रतनलालजीशेठ बूब यांचे स्मरणार्थ ३१०००/- रु ची भरीव देणगी देवून शाळेच्या बांधकामात मोठा वाट उचलला.
दि.१२ जून १९५० या शुभदिनी नगरचे मा. भाऊसाहेब फिरोदिया यांच्या शुभहस्ते म्युन्सिपल हायस्कूलचे नामांतरण "महात्मा गांधी हायस्कूल" असे करण्यात आले. या मागे श्री. लालचंद शेठ पारख यांची प्रेरणा होती. या कार्यक्रमात श्री. झुंबरलाल नावंदर रामदयाल भुतडा, घेवरचंद लुणावत, शिवराम चांडक, शंकरशेठ लोया, मोतीराम लोया आदींची उपस्थिती, सहकार्य व परिश्रम लाभले.
• बांधकाम विस्तार *
सन १९६५ मध्ये श्री.झुंबरलालजीशेठ नावंदर वाडिया चरीटेबल ट्रस्ट, श्री. गोकुळदास, श्री. इराणी यांनी प्रत्येकी एक खोलीचा खर्च स्वतः करून दक्षिणोत्तर आठ वर्गखोल्यांची काम पूर्ण केले व यामुळेच सन १९७५ मध्ये ज्युनियर कॉलेजचा प्रारंभ इगतपुरी शहरात झाला.
* विस्तारित बांधकामात व शाळा विकासात महत्वपूर्ण योगदान *
सन १९८० - १९८१ या वर्षी, वादळाच्या रूपाने आलेल्या नैसर्गिक आपत्तीत शाळेवरील पत्र उडाले, वास्तूचे खूप नुकसान झाले; परतं लत्कालीन मुख्याध्यापक श्री.जी.एम. यादी यांच्या प्रेरणेने, इगतपुरीतील शिक्षणप्रेमी नागरिक आजी माजी विद्यार्थी, शिक्षक संस्था पदाधिकारी आदींनी वर्षच्या आत वरील मजल्याचे काम पूर्ण केले.
सन १९८४ मध्ये शिक्षक श्री. वा. द. घोटीकर यांनी स्वखर्चाने स्टेज बांधून दिले.
श्री. कांतीलाल मुथा यांनी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून शाळेत बोरिंग करून दिले.
सन १९९०/९१ या वर्षी किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरु झाला. या वर्गाच्या बांधकामासाठी दानशूर "श्रीमती. कमलाबाई शंकरलाल लोया यांच्या नावे श्री. लोया परिवाराने उदार अंतःकरणाने देणगी दिली.
जून २००० पासून "माहिती व तंत्रज्ञान" (संगणक शिक्षण) हा विषय शाळेत सुरु झाला. परतं अद्यावत संगणक कक्ष नव्हता. हि गरज ओळखून संस्थेचे सन्माननीय सयस श्री. अरुण खेमनर यांनी ५१०००/- देणगी दिली. व अद्यावत संगणक कक्ष उभारला. या संगणक कक्षात आमदार व खासदार निधीतून ३ संगणक शाळेला प्राप्त झाले आहेत.
सन २०२२/२००३ याच कालखंडात संस्थेच्या सहकार्याने शाळेला संरक्षक भिंत बांधून देण्यात आली. क्रिडा विभागाच्या अनुदानातून अद्यावत व्यायाम शाळा तयार करण्यात आली.
सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात नव्यानेच सुरु झालेल्या कला व वाणिज्य महाविद्यालयासाठी इगतपुरी नगरपरिषदेने १२ वर्गखोल्या अद्यापानासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
सन २०१४-१५ मध्ये सॉसोनाईट कंपनीच्या भरीव आर्थिक निधीतून शाळेसाठी शुद्ध पेयजल (पिण्यायोग्य पानी असलेले) बोअरिंग व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहबांधून देण्यात आले आहे.
* ऋणनिर्देश शिल्पकारांचा *
शाळेच्या प्रारंभापासून ते आजपर्यंतच्या प्रवासात ज्या ज्या व्यक्तींनी वा संस्थांनी उदार अंतःकरणाने तम- मन-धनाने सर्वस्व अर्पण केले ते सर्व श्री. वाडिया चरीटेबल ट्रस्ट, श्रीमान बूब कुटुंबीय, श्रीमान राठी कुटुंबीय, श्रीमान पारख, श्रीमान बोथरा, श्रीमान चांडक, श्रीमान इराणी, श्रीमान झेड. आर. नावंदर, श्रीमान लोया कुटुंबीय, श्रीमान पिंयो, श्री. टाटीया आदींचे मनःपूर्वक आभार.
विद्यार्थी हे दैवत मानून त्यांची निरलस सेवा करणारे नामवंत शिखस्क श्री.ताडे, श्री.यार्दी, श्री.अडावदकर, श्री.भादलीकर, श्री. पुरोहित, श्री. भाट, श्री. नित्सुरे, श्री. मोरेश्वर शास्त्री जोशी, श्री.धोपेश्वरकर, श्री. कर्डिले, श्री.खान, श्री.निमगावकर, श्री. बुरकुले, श्री. देवळे, श्री. अ.ब. जामखेडकर, आदी शिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख कराव लागेल.
शाळेच्या हितचिंतकांची माजी विद्यार्थी व शिक्षकांची यादी न संपणारी आहे सर्व ज्ञात अज्ञातांना कृतज्ञतापूर्वक वंदन !!!!