शाळेचा इतिहास
सिन्नरशहरालगत नव्याने वसलेल्या शिवाजीनगर,महालक्ष्मीनगर, सरस्वतीनगर, वृंदावननगर या उपनगरातील पालकांचीमागणीओळखूनसंस्थेनेजून२००५ मध्ये बालकमंदिरातील एका वर्गाचीसुरुवात केली.
संस्थेचे मार्गदर्शन स्थानिक पदाधिकार्यांचे सहकार्य व सेमी मराठी माध्यमाच्या वर्गाचे दर्जेदार शिक्षण या बाबींमुळे अल्पावधीतच बालक मंदिर नवा रुपाला आले. व संस्थेनेही स्वतंत्र जागेचा शोध घेऊन इमारतीचे काम हाती घेतले.
जून २००८ मध्ये प्राथमिक विद्यामंदिर सरदवाडी, व न्यू.इंग्लिश मिडी,स्कूल सरदवाडी, या दोन्हीही माध्यमांच्या शाळा संस्थेच्या स्वतंत्र मालकीच्या इमारतीत सुरु झाल्या.
तत्कालिन अधीक्षीका सौ. माधवी पंडित मॅडम, प्र.मुख्याध्यापिका सौ.सुरेखा जेजुरकर मॅडम यांच्या सुयोग्य नियोजनामुळे दिवसेंदिवस शाळा कात टाकत गेली आहे.
सुरुवातीला संस्थेच्या संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर सिन्नरची संलग्न शाळा म्हणून असलेल्या या शाळेस ऑक्टोबर२०१३ मध्येइयत्ता१ली ते ८वी (सेमी मराठी ) माध्यमांची स्वयंम अर्थसाहाय्यीत शाळा म्हणून शासनाची स्वतंत्र मान्यता प्राप्त झाली.
संस्कारक्षम, संकल्पनाधारित, गुणवत्तापूर्ण,कृतियुक्त आनंददायी शिक्षण देणारी मराठी माध्यमाची दर्जेदार शाळा म्हणून शाळेचा नावलौकिक आहेच मात्रइ.५वी व इ.८वीशिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात सर्वाधिक शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी देणारी शाळा म्हणूनहीतालुक्यात प्रसिद्ध आहे. शाळेचे मागील ६ वर्षात ६० हून अधिक विदयार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षेसोबतच डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेतही विद्यालयाचे अध्याप पर्यंत ५ विदयार्थी पुणे येथे प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवडले गेले आहेत.
सध्या शाळेत बालक मंदिर ते इ. १०वी पर्यतचे वर्ग असून ८००हून अधिक विदयार्थी शिक्षण घेत आहेत.