संहतिः कार्यसाधिका! कार्याची यशस्वितता अनेकांच्या सहकार्यावर अवलंबून असते, संस्थेच्या या ब्रिदवाक्या प्रमाणे अनेकांच्या सहकार्यावरच संस्थेची शिक्षणाची गंगा अविरत प्रवाहित आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाबरोबरच त्यांच्यावर देशभक्तीचा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात रूजवावा या दृष्टीने संस्था सातत्याने नाविण्यपुर्ण उपक्रम राबवित आहे.
काळाची गरज ओळखून आधुनिक शिक्षण देण्याबरोबरच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय शिक्षण व समाजाच्या तळागाळातील सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, हा संस्थेच्या संस्थापकांनी व नंतरच्या काळातील पदाधिकाऱ्यांनी सजवलेल्या मूलभूत विचारावर संस्था मार्गक्रमण करीत आहे.
स्वातंत्र्याच्या तळमळीने व भारत मातेच्या प्रेमाने भारावून गेलेल्या ध्येयनिष्ठ तरूणांनी (संस्थापक) नाशिकला येऊन न्यू इंग्लीश स्कूल, म्हणजे आजच्या जु.स.रूंगटा हायस्कूलची स्थापना केली. यातूनच पुढे १ मे १९१८ रोजी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. आजमितीस संस्थेव्दारा पुर्वप्राथमिक ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत एकूण ४३ शैक्षणिक केंद्र चालविले जात आहे.