स्वातंत्र्याच्या तळमळीने व भारत मातेच्या प्रेमाने भारावून गेलेल्या ध्येयनिष्ठ तरूणांनी (संस्थापक) नाशिकला येऊन न्यू इंग्लीश स्कूल, म्हणजे आजच्या जु.स.रूंगटा हायस्कूलची स्थापना केली. यातूनच पुढे १ मे १९१८ रोजी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. आजमितीस संस्थेव्दारा पुर्वप्राथमिक ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत एकूण ४३ शैक्षणिक केंद्र चालविले जात आहे. नाशिक, नाशिकरोड, सिन्नर, नांदगांव, इगतपुरी या प्रमुख ठिकाणी संस्थेचा विस्तार असून, ग्रामीण व अति ग्रामीण भागातही संस्था ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.
विद्यार्थी ही संस्थेची खरी संपत्ती असून, संस्थेस माजी विद्यार्थ्यांची मोठी परंपरा लाभलेली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि.वा. शिरवाडकर हे आमच्या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत हे सांगतांना मला अभिमान वाटतो. समाजाच्या उन्नती बरोबरच राष्ट्राच्या प्रगतीचे स्वप्न उराशी बाळगून ते प्रत्यक्षात साकार करणारा आदर्श भावी नागरीक घडविण्याचे कार्य संस्था सातत्याने करीत आहे व करीत राहील.