नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक ही उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था गेले १०४ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूने १ मे १९१८ रोजी संस्थेची स्थापना झाली. स्वातंत्र्योत्तर काळातही राष्ट्रीय शिक्षणाचा वारसा संस्थेने आजपावेतो कायम जपला आहे. १ मे संस्थेचा वर्धापन दिन शाळा शाळांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे. संस्थेच्या विकासामध्ये संस्थेचे सर्व घटक ,समाजातील मान्यवर, दानशूर व्यक्ती, पालक व माजी विद्यार्थी यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
संस्था
संकुल
शिक्षक
शिक्षकेतर
विद्यार्थी संख्या
बालमंदिर
प्राथमिक विभाग
माध्यमिक विभाग